24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयअदानी ग्रुप विकत घेणार एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे २९.१८ टक्के शेअर्स

अदानी ग्रुप विकत घेणार एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे २९.१८ टक्के शेअर्स

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : देशातील आघाडीच्या अदानी ग्रुपने एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे २९.१८ टक्के शेअर्स विकत घेणार आहे. त्याचबरोबर आणखी २६ टक्के शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफरही दिली आहे. अदानी ग्रुपने आपल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली.

अदानी ग्रुपने आपल्या निवेदनात म्हटलं की, अदानी ग्रुपची उपकंपनी असलेली एनडीटीव्ही मीडिया नेटवर्क्स लिमिटेड न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील २९.१८ टक्के हिस्सा विकत घेणार आहे. तसेच उर्वरित २६ टक्के हिस्सा विकत घेण्याची ऑफरही अदानी ग्रुपने एनडीटीव्हीला दिली आहे. यासाठी ४९३ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

ज्याच्या एका शेअरची किंमत २९४ रुपये असेल. या व्यवहारामुळे एनडीटीव्हीच्या शेअर्सने शेअर बाजारात ५ टक्के उसळी मारलेली पहायला मिळाली. ज्यामुळे त्याची किंमत ३७६.५५ रुपयांवर पोहोचली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या