23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeउद्योगजगतअदानीची सेबी आणि डीआरआयकडून चौकशी सुरू

अदानीची सेबी आणि डीआरआयकडून चौकशी सुरू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अदानी ग्रूपला मोठा धक्का बसला आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांची डायरोक्टोरेट आॅफ रेव्हीन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि सेबीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी सोमवार दि़ १९ जुलै रोजी संसदेत दिली.

आर्थिक नियमनासंबंधी या कंपन्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. संसदेत याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये २.४५ टक्क्यांची, अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये ३.५३ टक्के, अदानी एन्टरप्रायझेसमध्ये ३ टक्के, अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये १.७५ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५ टक्के आणि अदानी पवारच्या शेअर्समध्ये ३.५५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

अदानींच्या काही कंपन्यांची चौकशी
केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नुकतेच मोठे बदल करण्यात आले होते. यात किशन राव आणि पंकज चौधरी यांच्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधी अनुराग ठाकूर यांच्याकडे हे मंत्रिपद होते. आता अनुराग ठाकूर यांना प्रमोशन देण्यात आले असून त्यांना क्रीडा व माहिती प्रसारण मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. नवनिर्वाचित केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी आज संसदेत अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी सेबी आणि डीआरआयच्या माध्यमातून सुरू आहे.

मुंबईत मृत्यूचे तांडव; पावसाने दाणादाण, दरड, संरक्षक भिंत, इमारत कोसळली, ३० मृत्युमुखी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या