27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयकोरोना मर्यादांचे पालन करा; धीर सोडू नका पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

कोरोना मर्यादांचे पालन करा; धीर सोडू नका पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट असून, देशातील सर्व नागरिकांनी कोरोनाविषयींच्या मर्यादांचे पालन करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दि़ २० एप्रिल रोजी देशाला संबोधीत करताना केले़ देशात आता लस उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही तसेच, पहिल्या लाटेवेळी आपल्याकडे अनेक साधनसामुग्रींचा अभाव होता. आता, परिस्थिती वेगळी आहे. जनतेच्या सहभागातूनच आपण कोरोनाला पराभूत करू शकतो, असे मोदींनी म्हटले. देशातील काही राज्यांत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून, तेथे असलेल्या परराज्यांतील कामगार, मजूर, नागरिकांनी खचून न जाता जेथे आहात तेथेच थांबावे, असा सल्ला दिला आहे़

देशात जलगतीने लसीकरण होत असून, येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये़ केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी कंपन्या ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. ऑक्सिजन पुरवठ्यावर काम सुरू आहे. ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन रेलच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. कोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुस-या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दु:ख मला समजू शकते.

कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कितीही कठीण परिस्थिती आली, तरी धैर्य, संयम गमावता कामा नये, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले आहे़ तसेच, देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अ‍ॅम्बुलन्स चालक, पोलिस कर्मचारी या कोरोना योद्धांचे कौतुक केले. घरातील लोकांना घराबाहेर पडू देऊ नका. प्रसार माध्यमांनीही लोकांना कोरोना निमयावलींचे पालन करण्याचे आवाहन करावे. आजच्या स्थितीत आपल्याला लॉकडाऊनपासून दूर रहायचे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले़

देशात लॉकडाऊन नाही
देशात कोरोनापासून वाचण्यसाठी विशिष्ट नियमावली आखून दिलेली आहे त्या नियमांनुसार देशवासीयांनी जर साद दिली़ तर देशात लॉकडाऊन लागणार नाही़ देशाला लॉकडाऊनपासून तुम्हीच वाचवू शकता. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये, असेही मोदी म्हणाले.

भारत बनला फार्मेसी ऑफ वर्ल्ड
औषध उद्योगाच्या प्रयत्नांमुळेच, आज भारताला जगात फार्मेसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. आपण या महामारीच्या काळात जगातील १५० हून अधिक देशांना आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

यूपीएससीकडून सर्व परीक्षांच्या मुलाखती स्थगित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या