27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयदिल्ली, पंजाबनंतर आता झारखंडमध्येही मोफत वीज

दिल्ली, पंजाबनंतर आता झारखंडमध्येही मोफत वीज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : झारखंडमध्ये दरमहा १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येणार आहे. १०० युनिट किंवा त्यापेक्षा कमी वीज वापरणा-या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे बिल भरावे लागणार नाही. या प्रस्तावाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने संमती दिली आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५५ ठराव मंजूर केले. याअंतर्गत राज्यातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्याचे मान्य करण्यात आले आहे. जुनी पेन्शन प्रणाली लागू करणारे झारखंड हे राजस्थान, छत्तीसगडनंतर तिसरे राज्य ठरणार आहे. तसेच मोफत वीज देण्याबाबत देखील सोरेन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

याशिवाय अन्न विभागाचा प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यामध्ये अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणा-या ६१ लाख शिधापत्रिकाधारकांना आता दरमहा १ रुपयाला १ किलो हरभरा डाळ मिळणार आहे.

महाराष्ट्रात शिंदे सरकार देणार वीज मोफत?
महाराष्ट्रात नुकतेच सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी करून त्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता १०० युनिटपर्यंत वीज मोफत करून शिंदे सरकार सामान्यांना दिलासा देणार का? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या