25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयगोव्यानंतर छत्तीसगडमध्येही काँग्रेसमध्ये बंड

गोव्यानंतर छत्तीसगडमध्येही काँग्रेसमध्ये बंड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गोव्यानंतर छत्तीसगड छत्तीसगड काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा उद्रेक समोर आला असून शनिवार दि. १६ जुलै रोजी ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाची मनीषा बाळगणारे टीएस सिंह देव यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता हे बंड कुठल्या वळणावर जाणार? याची चर्चा सुरु झाली आहे. गोव्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये काही राजकीय हलचाली होणार का? याची चर्चा रंगली आहे.

टीएस सिंह देव यांच्या राजीनाम्यानंतर भूपेश बघेल मंत्रिमंडळात सर्व काही ठिक नसल्याचे समोर आले आहे. तर छत्तीसगडच्या राजकारणात भूंकप येऊ शकतो. पंचायत राज विभागाचे मंत्री टीएस सिंहदेव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विभागाचे निर्णय घेतले जात होते. त्यामुळे टीएस सिंह देव नाराज होते. त्यातूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.  त्रिभुवनेश्वर शरण सिंह देव यांच्याकडे पंचायत आणि ग्रामीण विकास, लोक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, एवं परिवार कल्याण, वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक कर (जीएसटी) यांचा कारभारही होता. सिंह देव यांनी ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाचा राजीनामा दिला आहे.

पंचायतराजमध्ये ढवळाढवळ केल्यामुळे नाराज
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतराज विभागामध्ये ढवळा ढवळ केल्यामुळे नाराज सिंह देव नाराज होते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनाचे दहा हजार पेक्षा जास्त मनरेगा कर्मचारी राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन मिहन्यांपासून प्रदर्शन करत होते. राज्य सरकारने या कर्मचा-यांच्या सहाय्यक प्रकल्प अधिका-यांवर कारवाई केली. २१ कर्मचा-यांना निलंबित करण्यापूर्वी मंत्रि सिंह देव यांना विचारण्यातही आले नव्हते. काही दिवसांपूर्वी या सर्वांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले, तेव्हाही त्यांना विचारण्यात आले नाही. या सर्व प्रकारामुळे सिंह देव नाराज होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या