23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयगुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री बदलणार?

गुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री बदलणार?

एकमत ऑनलाईन

शिमला : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावलं आहे. दोन दिवस आधीच जराम ठाकुर हे दिल्लीहून शिमल्याला परतले होते. त्यावेळी केंद्रीय नेत्यांशी जयराम यांनी चर्चा केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याने राज्यात चर्चेला उत आला आहे. गुजरातमध्ये भाजपने केलेल्या नेतृत्वबदलानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने दिल्लीला बोलावल्याने आता राज्यात खांदेपालट होणार का अशी चर्चा होत आहे.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर जयराम ठाकुर हे शिमल्याला पोहोचले. पण त्यांना लगेच पुन्हा दिल्लीला बोलावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस नेत्यांना यामुळे घेरण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने मात्र असे काही होणार नसल्याचे म्हटले आहे. भाजप हिमाचलमध्ये २०२२ च्या निवडणुका जयराम यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

ठाकूर यांनी केला दिल्ली दौरा
मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी गेल्या आठवड्यात बुधवारी दिल्ली दौरा केला होता. बुधवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर जयराम ठाकुर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी निमंत्रण दिले होते. तसेच, मध्य प्रदेशातील उज्जैनलासुद्धा ते गेले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या