24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयगृहमंत्रालयानंतर संरक्षण मंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण जाहीर

गृहमंत्रालयानंतर संरक्षण मंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गृह मंत्रालयानंतर संरक्षण मंत्रालयानेदेखील अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांसाठी विविध विभागांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा शनिवार दि. १८ जून रोजी केली आहे.

संरक्षण मंत्री कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये भारतीय तटरक्षक दलापासून संरक्षण नागरी पदापर्यंत अग्निवीरांना हे आरक्षण देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक उपक्रमातही तरुणांची भरती केली जाईल. हे आरक्षण माजी सैनिकांना दिलेल्या आरक्षणापेक्षा वेगळे असेल असेदेखील संरक्षण मंत्रालायाकडून सांगण्यात आले आहे.

अग्निपथ योजनाला वाढत्या विरोधानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सेवेत ४ वर्ष पूर्ण करणा-या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या