मुंबई : ‘जून महिन्यात कोरोना विषाणूची परिस्थिती पाहून त्यानंतर सिनेमागृह खुली केली जातील’, असा निर्णय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे. दरम्यान, मंगळवारी असोसिएशन ऑफ फिल्म प्रोड्युसर, सिनेमा एक्झिक्युटर्स आणि फिल्म इंडस्ट्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये हा महत्त्वाच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे चित्रपट, मालिका आणि नाटक यांच्या शूटींगचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात फिल्म इंडस्ट्रीचे नुकसान झाले असून याबाबत यावेळी चर्चा केली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार; फिल्म इंडस्ट्री केव्हा सुरु केली जाणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी जावडेकर म्हणाले, ‘सध्या काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी आता छोटे – मोठे उद्योगही सुरु केले जात आहे. मात्र, फिल्मबाबत जून महिन्यात कोरोनाची स्थिती जाणून निर्णय घेतला जाणार आहे’.
Read More ‘भूल भुलैया 2′ लॉकडाऊनमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला; 31 जुलैला होणार प्रदर्शित