26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयअग्निपथ योजनेविरुद्ध जंतरमंतरवर सत्याग्रह

अग्निपथ योजनेविरुद्ध जंतरमंतरवर सत्याग्रह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर लष्कराच्या अग्निपथ या नव्या भरती योजनेविरोधात काँग्रेसचा सत्याग्रह सुरू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना बेरोजगारीच्या मार्गावर चालण्यास भाग पाडले आहे. तरुणांना वेळोवेळी नोक-यांच्या खोट्या आशा दिल्या जात आहेत. ८ वर्षात १६ कोटी नोक-या द्यायला हव्यात, पण तरुणांना फक्त पकोडे तळण्याचे ज्ञान मिळाले, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या सत्याग्रहात प्रियंका गांधींसह काँग्रेस नेते अग्निपथविरोधी फलक घेऊन बसले आहेत. आज राहुल गांधी यांचा वाढदिवसही आहे, मात्र त्यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. जंतरमंतरवर पोलिस आणि जलद कृती दल तैनात आहे.

काल सोनिया गांधी यांनी एका पत्राद्वारे युवकांना आंदोलनाची अंिहसक पद्धत अवलंबण्याचे आवाहन केले होते. ही योजना पूर्णपणे दिशाहीन असून तरुणांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. ही योजना रद्द व्हावी यासाठी काँग्रेस अंिहसक आंदोलन करेल, असेही त्या म्हणाल्या.

सरकार तरुणांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत आहे
अग्निपथ योजनेविरोधातील तरुणांचा राग शांत करण्यासाठी गृह आणि संरक्षण मंत्रालयाने आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळी, गृह मंत्रालयाने उअढऋ (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांना वयोमर्यादेत ३ ते ५ वर्षे सूट देण्याची घोषणा केली.

यानंतर संध्याकाळी संरक्षण मंत्रालयानेही अग्निवीरांना त्यांच्या मंत्रालयातील भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदांसोबत, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या 16 कंपन्यांमध्ये नियुक्त्यांमध्ये आरक्षण असेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या