22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयआगळीक सहन केली जाणार नाही -भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया

आगळीक सहन केली जाणार नाही -भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: लडाखच्या पूर्व क्षेत्रातील तणावाची परिस्थिती उद्भवली आहे. त्याचदरम्यान भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया  यांनी मोठे विधान केले आहे. भविष्यातील कोणत्याही संघर्षात हवाई दल हा आपल्या विजयातील महत्त्वाचा घटक असेल. चिनूक, अपाचे आणि या विमानांसह राफेल लढाऊ विमानांचा हवाई दलात समावेश झाल्याने एक सामरिक सामर्थ्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपले सुरक्षा दल कोणत्याही संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. वायुसेना कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमच्या उत्तर सीमेवर सध्याची सुरक्षा परिस्थिती अस्वस्थ आहे, युद्धाची किंवा शांततेचीही नाही.

भारतीय वायुसेना कोणत्याही देशाच्या वाईट कारवायांना चोख प्रत्युत्तर द्यायला तयार

हवाई दल प्रमुख म्हणाले की, ‘आजच्या काळात हवाईदल मजबूत असणे हे फार महत्वाचे आहे. आनंदाची बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत आपण आपले हवाई सामर्थ्य वाढवले ​​आहे. चीनबद्दल बोलताना ते म्हणाले की, लडाखच्या पूर्वेकडील क्षेत्रात चीनकडून मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे. चिनी बाजू एका विचारसरणीतूनच बोलत आहे. परंतु ज्या गोष्टी उघड झालेल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य प्राणप्रणाने सीमारेषेजवळ कार्यरत आहे. भारतीय वायुसेना कोणत्याही देशाच्या वाईट कारवायांना चोख प्रत्युत्तर द्यायला तयार आहे.’

चीनकडूनही एक सकारात्मक संदेश परंतु दिलेला शब्द पाळत नाही

अलीकडेच दोन्ही देशांदरम्यान लष्करी स्तरावरील एक मोठी बैठक पार पडली. ज्यामध्ये असे म्हटले होते की, एलएसीवरील वाद कोणाच्याही हिताचा नाही. चीनकडूनही एक सकारात्मक संदेश आला. परंतु बर्‍याचदा असे दिसून आले आहे की, चीन आपला दिलेला शब्द पाळत नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी चीनने प्रयत्न केला की त्यांना भारतीय प्रदेशात प्रवेश करता येईल. पण ज्याप्रकारे फिंगर एरियातील शिखरे भारतीय लष्कराने ताब्यात घेतली आहेत ते पाहता चीनची चिंता वाढली आहे.

या इंधनाचा मोठा सुरक्षित साठा लडाखमध्ये

दरम्यान, चीनला दणका देण्यासाठी लडाखमध्ये (भारताचे टी ९० आणि टी ७२ रणगाडे सज्ज झाले आहेत. चुमार डेमचोक परिसरात हे रणगाडे लढण्यासाठी सज्ज आहेत. भारताचे टी ९० आणि टी ७२ रणगाडे शून्याखाली उणे ४० अंश सेल्सिअस तापमानही कार्यक्षम राहू शकतात. हाडे गोठवणाऱ्या थंडीत कार्यक्षम राहण्यासाठी रणगाडे विशिष्ट प्रकारचे इंधन वापरतात. या इंधनाचा मोठा सुरक्षित साठा लडाखमध्ये आहे.

लडाखमध्ये १४ हजार ५०० फूट उंचीवर रणगाडे लढण्यासाठी सज्ज

भेदक हल्ला करुन लगेच जागा बदलून पुढील कारवाई करण्यासाठी टी ९० आणि टी ७२ रणगाडे ओळखले जातात. हे रणगाडे प्रचंड वेगाने युद्धभूमीत कार्यरत राहू शकतात. संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे जो एकाचवेळी अती थंड आणि अती उष्ण प्रदेशात रणगाड्यांच्या मदतीने लष्करी कारवाई करण्यासाठी सक्षम आहे. लडाखमध्ये १४ हजार ५०० फूट उंचीवर रणगाडे लढण्यासाठी सज्ज आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी सुरू होते. त्यामुळे थंडीच्या दृष्टीकोनातून रणगाडे सज्ज ठेवण्याची तयारी भारतीय सैन्याने केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या