23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयअग्निपथ : केंद्र सरकारकडून कॅव्हेट

अग्निपथ : केंद्र सरकारकडून कॅव्हेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्राच्या ‘अग्निपथ’ योजनेवरून पेटलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक भडका बिहारमध्ये दिसला. या योजनेविरुद्ध अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले.

केंद्राने अग्निपथ योजना १४ जूनला जाहीर केली. यात साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना संरक्षण दलात चार वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची तरतूद आहे. दरम्यान, न्यायालयाकडून कोणताही आदेश देण्यापूर्वी ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात दाखल याचिकांवर केंद्राची बाजू ऐकण्याचे आवाहन याद्वारे केंद्राने केले.

दरम्यान, निवृत्तीनंतर ७५ टक्के अग्निवीरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेत सुधारणा करण्यासाठी निवृत्त लष्करी अधिका-यांकडूनही याचिकेत सूचना मागवण्यात आल्या आहेत. कोर्ट आता यावर काय निर्णय देणार हे पहावे लागणार आहे.

ही योजना २४ जूनपासून लागू केली जाणार आहे. यात चार वर्षांच्या कालावधीसाठी नोकरीची तरतूद, तसेच प्रशिक्षित अग्निवीरांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता असल्याने या योजनेविरुद्ध बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगण आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये आंदोलने झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या