24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयअग्निपथ दिशाहीन : सोनिया गांधी

अग्निपथ दिशाहीन : सोनिया गांधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ या कंत्राटी लष्कर भरतीय योजनेने सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना अनेक तरुण रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करत आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तरुणांना हिंसा न करण्याचे आवाहन केले असून अग्निपथ योजना हे सरकारचे दिशाहीन पाऊल असल्याचे म्हटले आहे.

सोनिया गांधी या सध्या आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण त्यांनी आपला संदेश काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याद्वारे तरुणांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवला आहे. सोनिया गांधी यांची भूमिका मांडणारे एक पत्रच रमेश यांनी प्रसिद्ध केले आहे. या पत्रात सोनिया गांधी म्हणतात, माझ्या प्रिय तरुण सहका-यांनो तुम्ही भारतीय सैन्यात सामिल होऊन देशसेवेचे महत्वपूर्ण काम करण्याची आशा बाळगता. सैन्यात लाखो पदे रिक्त असतानाही गेल्या तीन वर्षात भरती न झाल्याचे दु:ख मी समजू शकते. हवाई दलात भरती परीक्षा देऊन निकाल आणि नियुक्तीची वाट पाहत असलेल्या तरुणांप्रती देखील मी सहानुभूती व्यक्त करत असल्याच्या भावना सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या