22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयअग्निपथ योजना : ५६,९६० अर्ज दाखल

अग्निपथ योजना : ५६,९६० अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारतीय हवाईदलात भरती होण्यासाठी तरूणांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होण्यासाठी केवळ तीन दिवसात ५६ हजार ९६० जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

देशभरातील निदर्शनानंतर शुक्रवारपासून भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. भरतीसाठी इच्छुक असणा-या युवकांना careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन हवाई दलाकडून करण्यात आले आहे. एकूण ५० हजार जागा भरण्यात येणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या