चंडीगड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना सर्वाधिक विरोध केलेल्या हरियाना-पंजाब या उत्तरेमधील राज्यांनी आता अग्निपथ योजनेबाबतही असाच पवित्रा घेतला आहे. या योजनेसाठी अर्ज केल्यास समाजात एकटे पाडले जाईल, असा इशारा खाप जमातीच्या पंचायतींनी दिला.
खाप, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या संघटनांच्या नेत्यांची रोहतक जिल्ह्यातील सांपला गावात बैठक झाली. या बैठकीला हिमाचल प्रदेश आणि राजस्थान येथील विविध जातींच्या पंचायतींचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यात ही भूमिका ठरविण्यात आली.