34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयडीआरडीओकडून खासगी उत्पादकांशी करार

डीआरडीओकडून खासगी उत्पादकांशी करार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतासाठी अनेक संहारक क्षेपणास्त्रांची निर्मिती करणा-या डीआरडीओने ( भारतीय संरक्षण संशोधन संस्था) आता खासगी उद्योगांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. डीआरडीओ करीत असलेल्या संरक्षणविषयक सामुग्रीच्या संशोधन व उत्पादनासाठीही खासगी उद्योगांना सहभागी करुन घेण्यास संमती दिली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणानूसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डीआरडीओच्या अधिका-यांनी याबाबत माहिती दिली. डीसीपीपी (डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर) या प्रकल्पांतर्गत ही मुभा दिल्याचे सांगण्यात आले. प्रारंभी जमिनीवरुन हवेत मारा करणा-या क्षेपणास्त्रांच्या विकास व उत्पादनासाठी काम होणार आहे. त्यासाठी अनेक खासगी कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे, असेही अधिका-यांनी सांगितले.

क्षेपणास्त्र निर्मितीशिवाय अन्यही प्रकल्प
डीआरडीओने खासगीकरणाच्या माध्यमातून विकसित व उत्पादित करावयाच्या संरक्षण सामुग्रीमध्ये केवळ क्षेपणास्त्रांचाच समावेश नसून अन्यही तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. ऑल वेदर हवाई रक्षा प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न असून लढाऊ विमाने, मानवविरहित विमाने आदींच्या हल्ल्यापासूनही बचाव करण्याच्या प्रणालींचा त्यात समावेश असेल, असे अधिका-यांनी सांगितले. डीआरडीओने टाटा व कल्याणी उद्योगसमुहांना एटीएजीएस तोफा विकसित करण्यास तांत्रिक सहकार्य केले असून त्यांचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. काही वर्षांतच या तोफा भारतीय लष्करांना मिळणार आहेत.

राज्यात लॉकडाऊन लावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या