25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय कृषि कायदे स्वागतार्ह पण शेतक-यांना सुरक्षाही द्या

कृषि कायदे स्वागतार्ह पण शेतक-यांना सुरक्षाही द्या

नाणेनिधीचा मोदी सरकारला सल्ला; कायद्यांचे कौतूक

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : भारताच्या नवीन कृषि कायद्यांमध्ये कृषि क्षेत्रातील सुधारणांना पुढे नेण्याची क्षमता दिसत असल्याचे कौतुक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ)करण्यात आले आहे. मात्र यावेळी त्यांनी नव्या बदलांमुळे ज्यांचे नुकसान होत आहे त्यांना संरक्षण देणेही महत्वाचे आहे असा सल्लाही दिला आहे.आयएमएफचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर गेरी राइस यांनी वॉशिंग्टन येथे पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

नव्या कृषि कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच शेतकरी नेते तसेच केंद्र सरकारमध्ये चर्चेची नववी फेरी पाड पडणार असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून हे वक्तव्य आले आहे, हे विशेष आहे. नव्या बदलांमुळे शेतकरी थेट विक्रेत्यांच्या संपर्कात येणार आहेत. दलाल नसल्याने शेतक-यांना जास्त नफा मिळणार आहे. कार्यक्षमता वाढवणे तसेच ग्रामीण विकासाला दिलेले हे समर्थन महत्वाचे आहे,असेही राइस यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या