23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeराष्ट्रीयएम्सचा सर्व्हर ६ दिवसांपासून ठप्प, हॅकर्सने मागितली २०० कोटींची खंडणी

एम्सचा सर्व्हर ६ दिवसांपासून ठप्प, हॅकर्सने मागितली २०० कोटींची खंडणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ अर्थात एम्सचा सर्व्हर मागील ६ दिवसांपासून ठप्प झाला आहे. एम्सचा सर्व्हर हॅकर्सने हॅक केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली. हॅकर्सने एम्स प्रशासनाकडे जवळपास २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. ही रक्कम क्रिप्टोकरन्सीच्या (आभासी चलन) स्वरुपात द्यावी, असेही हॅकर्सने म्हटले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.

गेल्या बुधवारपासून एम्सचा सर्व्हर डाऊन आहे. सर्व्हर हॅक झाल्याने ३ ते ४ कोटी रुग्णांचा तपशील धोक्यात आला आहे. सध्या रुग्णालयातील आपत्कालीन रुग्ण, ओपीडी, प्रयोगशाळा आणि इतर कामकाज पेन आणि कागदाच्या साह्याने केले जात आहे. या घटनेची माहिती तपास यंत्रणांना देण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

रुग्णालयाच्या एका अधिका-याने सांगितले की, तपास यंत्रणांच्या शिफारशीनुसार रुग्णालयातील सर्व संगणकांवरील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. एम्सच्या सर्व्हरमध्ये अनेक माजी पंतप्रधान, मंत्री, न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिका-यांसह अनेक व्हीआयपी रुग्णांचा डेटा आहे. हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीच्या स्वरुपात २०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने दिली.

एनआयसीने मिळविले नियंत्रण
दरम्यान, एनआयसीने ई-हॉस्पिटल्सचा डेटाबेस आणि अ‍ॅप्लिकेशन सर्व्हरवर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. तसेच एनआयसीचे पथक एम्समधील इतर ई-हॉस्पिटल सर्व्हरवरून व्हायरस स्कॅन करून ते डिलिट करण्याचे काम करत आहेत.

पूर्ण नियंत्रणासाठी ५ दिवस लागणार
आतापर्यंत चार सर्व्हर स्कॅन केले असून डेटाबेसवर नियंत्रण मिळवले आहे. पण एम्सच्या सर्व्हरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी किमान ५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, असेही एनआयसीच्या सूत्रांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या