नवी दिल्ली : विमान नियामक नागरी उड्डाण संचालनालयाने एअर इंडियावर कारवाई करत १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्याबद्दल डीजीसीएने एअर इंडियावर हा दंड ठोठावला, असे या संदर्भातील अहवालात सांगण्यात आले.
वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्याबद्दल आणि त्यानंतर प्रवाशांना अनिवार्य नुकसान भरपाई न दिल्याबद्दल एअर इंडियाला १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यासंबंधीची नोटीसही बजावण्यात आली आहे.