25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeराष्ट्रीयएअर इंडियाचे ११ ऑगस्टपासून उड्डाणे

एअर इंडियाचे ११ ऑगस्टपासून उड्डाणे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारी सुरू असून, अद्याप दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच हा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विमान सेवा एका देशातून दूस-या देशात सुरू ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता एअर इंडिया ही विमानसेवा येत्या ११ ऑगस्टपासून त्यांची उड्डाणे सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाची प्रादेशिक उपकंपनी अलायन्स एअर ११ ऑगस्टपासून रांचीमार्गे कोलकाता-भुवनेश्वर उड्डाणे सुरू करणार आहे.

अलायन्स एअरने दिलेल्या माहितीनुसार, ते ११ ऑगस्टपासून कोलकाता-रांची-भुवनेश्वर मार्गावर उड्डाणे सुरू करत आहेत. हे उड्डाण प्रत्येक सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सुरू राहणार आहे. ही विमान कंपनी या शहरांना जोडण्यासाठी ७० आसन क्षमता असणारे विमान सुरू करणार आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, फ्लाइट एक्स ९९ एल ७२० सकाळी ८ वाजता कोलकाता येथून सुटणार असून सकाळी ९:४० वाजता रांचीला पोहोचेल आणि तेथून सकाळी १०.१० वाजता रवाना होऊन ११.१५ वाजता भुवनेश्वरला पोहोचणार आहे. यासह ९ए ७१९ हे फ्लाईट भुवनेश्वर येथून १२.४५ वाजता सुटणार आहे तर १२.५० वाजता रांचीला पोहोचणार आहे.

डेल्टाचा कांजण्यांप्रमाणे होत आहे संसर्ग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या