बंगळुरु : जे हवाई चप्पल वापरतात त्यांनी हवाई जहाजमधून प्रवास करायला हवा असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून त्यांनी सोमवारी कर्नाटकतील शिवमोगा जिल्ह्यातील शिवमोगा एअरपोर्टचं उद्घाटन केले.
यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. भारतातील एव्हिएशन मार्केट वेगाने वाढत असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. मोदी म्हणाले, येत्या काळात भारताला हजारो विमानांची गरज पडेल तसेच मेड इन इंडिया पॅसेंजर विमानांचे दिवस येणे आता फार दूर नाही. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. म्हणाले, २०१४ पूर्वी एअर इंडिया ही निगेटिव्ह कारणांसाठी चर्चेत होती. तसेच ही कंपनी घोटाळ्यांसाठीच चर्चेत होती.
शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील भाजपचे स्ट्राँगमॅन बी. एस. येडियुरप्पा यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त नव्या शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी येडियुरप्पांना सदिच्छा देण्यासाठी मोदींनी उपस्थितांना आपल्या मोबाईलचे फ्लॅश सुरु करण्यास सांगितले.