23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयअधिवेशनादरम्यान अजित पवार तडकाफडकी बाहेर

अधिवेशनादरम्यान अजित पवार तडकाफडकी बाहेर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे पार पडत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या अधिवेशनात आज मोठे नाराजी नाट्य घडले. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाषणाची संधी दिली. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलण्याची संधी न मिळाल्याने ते कार्यक्रमातून तडकाफडकी बाहेर पडले. त्यामुळे राष्ट्रवादीतील नाराजीनाट्याची चर्चा रंगली.

अजित पवार यांनी अचानक बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याने कार्यक्रमस्थळी चांगलाच गोंधळ उडाला. समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत अजित पवार यांनाही भाषणाची संधी दिली जाईल, असे जाहीर केले. मात्र, अजित पवार पुन्हा भाषणासाठी आलेच नाहीत.

राष्ट्रीय अधिवेशनात घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी नाराजीची चर्चा फेटाळून लावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यामुळे वेगवेगळ््या राज्यातील विविध मान्यवरांनी भाषणे केली. महाराष्ट्रातून छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपले विचार मांडले.

लक्षद्वीप, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ असा विविध राज्यातील मान्यवर या अधिवेशनासाठी आले होते. हे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील अधिवेशन नव्हते. हे राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यामुळे मी भाषण केले नाही. सर्वांची उत्सुकता होती. मात्र, जे काही बोलायचे ते मी महाराष्ट्रात बोलेन, असे अजित पवार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या