वाराणसी : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. अखिलेश यादव जेव्हा मुख्यमंत्री होते़ तेव्हा मला उत्तर प्रदेशमध्ये येण्यापासून १२ वेळेस रोखण्यात आले होते व २८ वेळा मला येण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आली होती, आता आलो आहे.
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा)चे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्यासोबत युती केली आहे. मी मैत्री निभवण्यासाठी आलो आहे. आम्ही दोघं यूपीमध्ये टक्कर देऊ, असे ओवेसींनी बोलून दाखवले आहे. यानंतर ओवेसी जौनपूरकडे रवाना झाले.२ आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष खासदार ओवेसी वाराणसीत पोहचले होते. विमानतळावर पोहचताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
यावेळी अखिलश यादव यांच्यावर निशाणा साधताना ओवेसींनी म्हटले की, त्यांना वाटते लोकांनी गुलामासारखे राहून त्यांना मतदान करावे व अन्य कुणीही निवडणूक लढवू नये. मात्र, जेव्हा आम्ही कोणतीही निवडणूक लढवतो तेव्हा ती जिंकणे हाच आमचा उद्देश असतो.