22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाभारतीय फुटबॉल संघाचे ऍलेक्स ऍम्ब्रोस यांची हकालपट्टी

भारतीय फुटबॉल संघाचे ऍलेक्स ऍम्ब्रोस यांची हकालपट्टी

एकमत ऑनलाईन

मुंबई : लैंगिक छळाच्या आरोपानंतर एलेक्स एम्बोसची भारतीय फुटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे सदस्य डॉ. एसवाय कुरेशी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

‘अंडर-१७ महिला संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक ऍलेक्स ऍम्ब्रोस यांना लैंगिक छळ केल्याप्रकरणी पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे, अशा आशयाचे ट्वीट डॉ. एसवाय कुरेशी यांनी केलंय. सीओएने ३० जून रोजी अ‍ॅलेक्स ऍम्ब्रोसला पदावरून हटवण्याचे संकेत दिले होते. परंतु त्यावेळी त्यांचं नाव उघड करण्यात आलं नव्हतं.

‘अंडर-१७ भारतीय महिला फुटबॉल संघात गैरवर्तनाचा प्रकार घडलाय. सध्या हा संघ युरोप दौ-यावर आहे. प्राथमिक कारवाई म्हणून फेडरेशनने पुढील चौकशीपर्यंत संबंधित व्यक्तीला तात्पुरतं निलंबित केले आहे.’, अशी माहिती देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या