27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयसर्व शेतक-यांना योजनेचा लाभ मिळावा : कृषी मंत्री तोमर

सर्व शेतक-यांना योजनेचा लाभ मिळावा : कृषी मंत्री तोमर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रसरकार अनेक योजना चालवत असतात. त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा आर्थिक मदतनिधी जमा होतो. कृषी मंत्री तोमर यांनी घेतलेल्या बैठकीत आज देशातील विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांना बोलावून त्यांचं मत जाणून घेण्यात आलं. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, पंजाब, राजस्थान, आसाम, अरूणाचल प्रदेश इत्यादी राज्यातील कृषी मंत्र्यांनी त्यांचे विचार सदर बैठकीत मांडले.

केंद्रिय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यातील कृषी मंत्र्यांसोबत घेतलेल्या एका वर्च्युअल बैठकीत शेतकऱ्यांच्या विकासाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान योजनेस पात्र असणारा कुठलाही शेतकरी योजनेपासून वंचित राहता कामा नये असे आदेश देण्यात आले. तसेच देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांचा डेटा लवकऱ्यात लवकर जमा करून अपडेट करण्यासही सांगितले आहे.

माहितीसाठी दरवर्षी पीएम किसान योजनेअंतर्गत योजनापात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांच्या तीन इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त धनराशी ११.३७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांजवळ जमीन आहे त्यांनाच मिळतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या