27 C
Latur
Friday, February 26, 2021
Home राष्ट्रीय कर्नाटकात प्रवासी वाहतुकीवरील सर्व निर्बंध रद्द करण्यात आले

कर्नाटकात प्रवासी वाहतुकीवरील सर्व निर्बंध रद्द करण्यात आले

एकमत ऑनलाईन

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटकात प्रवासावरील सर्व निर्बंध रद्द करण्यात आले. कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढू लागल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते.

प्रवासासाठी ई-पास बाळगण्याची गरज नाही
कर्नाटकात प्रवासावरील सर्व निर्बंध रद्द करण्यात आले. कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढू लागल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते. कर्नाटकात आता प्रवासासाठी ई-पास बाळगण्याची गरज नाही तसेच राज्यात प्रवेश केल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होण्याचीही आवश्यकता नाही. ‘हँड स्टॅम्पिंग’ही रद्द करण्यात आले आहे.

विशेष परवानगीची आवश्यकता नाही
व्यक्तीगत प्रवास आणि माल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लावू नयेत असे केंद्र सरकारने तीन दिवसांपूर्वी पत्रक काढून स्पष्ट केले आहे. कर्नाटक सरकारने याच आदेशाला अनुकूल ठरणारा निर्णय जाहीर केला आहे. सुधारीत प्रोटोकॉलनुसार कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी पास किंवा विशेष परवानगीची आवश्यकता नाही. राज्याच्या सीमांवर बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर वैद्यकीय तपासणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लोक स्वत:च्या खासगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने, रेल्वे, विमानाने कर्नाटकात येऊ शकतात. त्यांच्या प्रवासावर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. चेह-यावर मास्क लावणे, दोन मीटर फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी बंधनकारक असतील. सॅनिटायझर, साबणाने सतत धुत रहाण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

१४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक होते
याआधी कर्नाटकात प्रवेश केल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक होते. त्यांच्यावर स्वयंसेवकांमार्फत लक्ष ठेवले जायचे. सेवा सिंधु अधिका-यांच्या माहितीनुसार, कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी मागच्या सहा महिन्यात ११ लाख लोकांनी सेवा सिंधू वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केले. कर्नाटकप्रमाणे दिल्लीतही ब-याच गोष्टी सुरु झाल्या असून तिथल्या राज्य सरकारचीही मेट्रो सेवा सुरु करावी, अशी भूमिका आहे.

धमार्बाद-कुंडलवाडी रस्ता बनला जीवघेणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या