22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयसाबरमती नदीतील सर्व नमुने कोरोनाबाधित

साबरमती नदीतील सर्व नमुने कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूबाबत दररोज कुठली ना कुठली धक्कादायक माहिती समोर येत आहे. देशातील अनेक शहरांमधील सांडपाणी वाहून नेणा-या वाहिन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता नैसर्गिक पाण्याच्या स्रोतामध्येही कोरोना विषाणू सापडला आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नदीतील विविध ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याने शास्त्रज्ञांनाही धक्का बसला आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती नदीसह कांगरिया, चांदोला तलाव येथील पाण्याच्या नमुन्यांमध्येही कोरोना विषाणू सापडला आहे. एवढया मोठया प्रमाणावर नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर तज्ज्ञांनी आसाममधील गुवाहाटी येथीस नद्यांमधील पाण्यांच्या नमुन्यांचीही तपासणी केली. त्यामध्ये आसाममधील भारू नदीमधून घेण्यात आलेल्या नमुन्यामध्ये कोरोना विषाणू सापडला.

नद्यांमधून जे नमुने घेण्यात आले़ त्यामध्ये विषाणूची उपस्थिती ही खूप अधिक दिसून आळी. नद्यांच्या पाण्यामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आयÞआयटी गांधीनगरसह देशातील आठ संस्थांनी शोध घेतला. त्यामध्ये नवी दिल्ली स्थित जेएनयूच्या स्कूल ऑफ इन्व्हायरमेंट सायन्सच्या संशोधकांचाही समावेश होता. गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे मनीष कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ सीवेज लाईनमध्येच कोरोना विषाणू जीवित दिसून आला होता.

सर्व नमुणे पॉझिटिव्ह
आमच्या टीमने जेव्हा नदीच्या पाण्याचे सँपल घेतले आणि त्याची तपासणी केली तेव्हा आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली आहे. अहमदाबादमध्ये सर्वाधिक वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लँट आहे आणि गुवाहाटीमध्ये एकही नाही. आमच्या टीमने या दोन्ही ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली आणि दोन्हीकडे नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

चार महिन्यात घेण्यात आले नमुने
गांधीनगर येथील इंडियन इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे मनीष कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने ३ सप्टेंबरपासून २९ डिसेंबर २०२० पर्यंत दर आठवड्याला नदींचे नमुने घेतले होते. साबरमतीमधून ६९४, कांकरिया येथून ५४९ आणि चंदोला येथून ४०२ नमुने घेण्यात आले. या सर्व नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू हा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्येही जिवंत राहू शकतो अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चार राज्यांत १ लाखांवर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या