21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयसर्व आरोपीना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजार राहण्याचे आदेश

सर्व आरोपीना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजार राहण्याचे आदेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी गुरूवार ३ डिसेंबरपासून सुरु झाली खरी. मात्र पहिल्या दिवशी सातपैकी केवळ तीन आरोपी न्यायालयापुढे हजर झाल्याने न्यायालयाची कारवाई होऊ शकली नाही. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात पार पडलेल्या गुरूवारच्या सुनावणीत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत, अजय राहिरकर आणि समीर कुलकर्णी हे तीन आरोपी न्यायालयापुढे हजर झाले होते.या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या तातडीने न्यायालयापुढे हजर होऊ शकणार नाहीत असे कळवण्यात आले.

त्यावर न्यायालयाने येत्या १९ डिसेंबरला सातही आरोपींना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनलॉक नंतर राज्यभरातील सर्व कनिष्ट कोर्टांचे नियमित कामकाज आता सुरु झालेले आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टाने घेतला आहे.वास्तविक गेल्यावर्षी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात आश्वासन दिले होते़, की, डिसेंबर २०२० पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल. मात्र लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ १४ जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण ४७५ साक्षीदार आहेत़ ज्यातील ३०० हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे. मार्चपासून कोरानाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे यात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे महिन्याभरात ही सुनावणी कशी पूर्ण होणार हा सवालच आहे.

खटल्यात जाणूनबुजून विलंब होत असल्याचा आरोप
गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याची सुनावणी जलदगतीने घेण्याचे निर्देश हायकोर्टाने याआधीच एनआयए कोर्टाला दिलेले आहेत. मात्र अनेकदा या खटल्याच्या सुनावणीला काही वकील हजरच राहत नाहीत. या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जात आहे, असा आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्यावतीने वारंवार करण्यात आला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए कोर्टाने लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी करत सध्या जामीनावर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात केला होती.

रजनीकांत करणार ३१ डिसेंबर रोजी पक्षाची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या