36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयपीडीपीच्या ‘त्या’ तिन्ही नेत्यांचा काँगे्रसमध्ये प्रवेश

पीडीपीच्या ‘त्या’ तिन्ही नेत्यांचा काँगे्रसमध्ये प्रवेश

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पीडीपीच्या प्रमुख तीन नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र झेंड्यासह राज्याचा विशेष दर्जा पुन्हा बहाल करेपर्यंत आपण तिरंगा ध्वज हाती घेणार नाही, या मुफ्ती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराज झालेले टी.एस. बाजवा माजी प्रदेश सचिव हसन अली वफा आणि माजी आमदार वेद महाजन यांनी राजीनामा दिला होता.

विशेष म्हणजे या तिघांनी राजीनामा देताना मेहबुबांना दोन पानी पत्र देखील पाठवले होते. तुमच्या वक्तव्याने आमच्या देशभक्तीच्या भावनेला धक्का बसला आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. आमच्या इच्छेविरोधात अनेक घडामोडी घडून देखील आम्ही पक्षाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिलो. मात्र आव्हानांवर मात करण्याऐवजी काही घटक पक्षाला चुकीच्या मार्गावर नेत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या