बंंगळुरू : कर्नाटकात येडीयुरप्पांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. भाजपच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. आमदार बसनगौडा यतनाल यांनी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, येडीयुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी. जे कोणी ब्लॅकमेल करतात किंवा पैसे देतात त्यांना मंत्रिपद दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी सीडी आणि सीडी प्लस पैसे असा कोटा असल्याचेही बसनगौडा यतनाल यांनी म्हटले.
बसनगौडा यतनाल यांनी जोरदार हल्लाबोल केला असून, त्यांनी म्हटले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्यात आले आहे. तर भाजपचे आणखी एक आमदार कालाकप्पा बंदी यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी या मंत्रिमंडळ विस्ताराने खूश नाही याकडे पक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तारात आज ७ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. येडीयुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना मंत्र्यांची यादी सोपवली होती. पक्षश्रेष्ठींनी अनेक दिवस त्यावर चर्चा केल्यानंतर शिक्कामोर्तब केले होते़ आता मंत्र्यांच्या शपथविधीनंतर नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे कर्नाटक भाजपचे अनेक नेते नाराज आहेत.
कर्नाटकात मुख्यमंत्र्यांसह २७ मंत्री आहेत. आता त्यात नवीन ७ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये मुरुगेश निरानी, उमेश कट्टी, अंगारा, योगेश्वर, अरविंद लिंबावली, एमटीबी नागराज, शंकर आर यांचा समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेणा-या योगेश्वर यांच्यावर भाजपच्या विश्वनाथ यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, योगेश्वर यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी रिअल इस्टेटमध्ये फसवणूक केली असून ते मंत्री झाले आहेत. आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला तेव्हा ते बॅगा उचलून जात होते. आता ते मंत्री आहेत असेही ते म्हणाले.
लसीवर विश्वास नसल्यास पाकिस्तानात जा