34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीय१८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी द्या

१८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी द्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे़ इतकेच नाही तर मोदींना लाहिलेल्या या पत्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणीही केली आहे. या पत्रामध्ये असोसिएशनने सहा महत्वाचे मुद्दे मांडले असून त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असतानाच देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे सांगताना खेद होत आहे, असे म्हटले आहे़ तसेच पुढे देशामध्ये सध्या सात लाख ४० हजार अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण असल्याचेही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण २४ तासांमध्ये आढळून आले. ही कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे, असेही कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करताना देशातील डॉक्टरांच्या या सर्वात मोठ्या संस्थेने म्हटले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे साडेतीन लाख सदस्य भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीशी असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पहिल्या फळीतील कोरोना योद्धे आणि सर्वसामान्यांचे लसीकरण सुरु झालं आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाधितांची ओळख पटवून त्यांना ट्रेस करुन त्यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात ज्या सुचना जारी केल्यात त्याप्रमाणे काम केले जात आहे. मात्र मोठ्या प्रमाणात लोकं मास्क न घातला एका जागी कर्दी करतात, कोरोनासंदर्भातील नियम पाळत नाहीत, कोरोना विषाणूमध्ये सतत बदल होत असल्याने आरोग्य कर्मचाºयांची मेहनत निष्फळ ठरत असून, दुसºया लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे सोसिएशनने म्हटले आहे.

सध्या कोरोना नियम न पाळणा-यांंविरोधात कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणात बेड्स आणि आॅक्सिजनची सुविधा असणारे बेड्स उपलब्ध करुन देणे, आरोग्य कर्मचा-यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवणे. त्याचप्रमाणे नियमानुसार संपूर्ण उपचार करुन घेणे या गोष्टींवर सध्याच्या काळात भरं देणे गरजेचे आहे, असेही असोसिएशनने पत्रात नमूद केले आहे़ आतापर्यंत देशामध्ये ७ कोटी ९१ लाख व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली असून, त्यापैकी ६ कोटी ८६ लाख व्यक्तींना पहिला डोस तर एक कोटी पाच लाख व्यक्तींना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाºयांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र ज्या वेगाने संसर्ग होत आहे ते पाहता आम्ही तुम्हाला विनंती करतो की लसीकरणाची गती वाढवली पाहिजे आणि १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे.

 

महामार्गालगत झाडे लावा; नितीन गडकरींचा कंत्राटदारांना इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या