23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयमतदानासाठी अल्वा यांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

मतदानासाठी अल्वा यांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : येत्या ६ ऑगस्ट रोजी होणा-या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा मैदानात उतरल्या आहेत. अल्वा यांनी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील खासदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

अल्वा यांनी सर्व खासदारांना आवाहन केले की कोणतीही भीती न बाळगता आणि राजकीय दबावाला जुगारून मला मतदान करावे. एक व्हीडीओ शेअर करून त्यांनी म्हटले की, आपण सर्वोत्तम उमेदवार आहोत. कारण मला कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती निर्माण करण्यासाठी मी वचनबद्ध राहून निष्पक्षपणे काम करेल असेही अल्वा यांनी म्हटले. मी प्रत्येक खासदाराला आवाहन करते की, ६ ऑगस्ट रोजी होणा-या निवडणुकीत मला कोणतीही भीती न बाळगता मतदान करावे.

उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास मी राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्यांवर एकमत घडवून आणण्यासाठी आणि संसदेची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यासाठी वचनबद्ध असेल असेही अल्वा यांनी नमूद केले. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी कोणताही व्हिप नसून गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. खासदार कोणत्याही दडपणाशिवाय मतदान करू शकतील. त्यामुळे सर्वपक्षीय खासदारांनी कोणतीही भीती न बाळगता मला मतदान करावे असेही त्यांनी व्हीडीओमध्ये म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या