22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयअमर सिंह यांचं निधन

अमर सिंह यांचं निधन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, १ ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंह यांचं निधन झालं आहे. सिंगापूर येथील एका हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशातील ते मोठे नेते होते.

गेल्या काही महिन्यांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. ते आयसीयूमध्ये होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. ५ जुलै २०१६ रोजी त्यांची खासदार म्हणून निवड झाली. समाजवादी पक्षापासून दूर गेल्यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता कमी झाली होती. प्रकृतीच्या समस्या उद्भवण्यापूर्वी ते भाजपाच्या जवळ गेले होते. देशात यूपीएचं सरकार असताना आणि समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव यांचा शब्द अंतिम समजला जात असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते.

आज अमरसिंह यांनी ट्वीटरवर स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली होती आणि लोकांना ईदच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. अमरसिंह यांचे प्रोफाइल पाहता असे दिसून येते की, आजारी असूनही ते सोशल मीडियावर बर्‍यापैकी अ‍ॅक्टिव होते. समाजवादी पक्षाचे कट्टर नेते असलेल्या अमर सिंह यांचा मार्च महिन्यात एक व्हिडिओ चर्चेत होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूची बातमी ही अफवा असल्याचे सांगितले होते.

Read More  दरवाढीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या