जम्मू : मुसळधार पावसामुळे अमरनाथ गुहेजवळ पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने अमरनाथ यात्रा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
गुहेच्या आजूबाजूच्या डोंगरात पडलेल्या पावसामुळे आज दुपारी तीनच्या सुमारास जलाशय आणि जवळचे झरे तुडुंब भरले. गुहेजवळ पूर आल्याने तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला असून आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त भाविकांना पूर बाधित क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले.