24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयअमर्त्य सेन यांचा पुरस्कारास नकार

अमर्त्य सेन यांचा पुरस्कारास नकार

एकमत ऑनलाईन

कोलकाता : नोबेल पुरस्कार विजेते प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने दिला जाणार वंग विभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान, अमर्त्य सेन यांची मुलगी अंतरा देव सेन यांनी पुरस्कार नाकारण्याचे कारण स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी वंग विभूषण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांचे वितरण लवकरच केले जाणार आहे. अमर्त्य सेन यांच्या नावाचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मात्र, अमर्त्य सेन सध्या युरोपात आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत नसल्याचे त्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सरकारले कळवले होते. आता त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

बाबांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळं अन्य कुणाला तरी हा पुरस्कार दिला जावा अशी त्यांची इच्छा आहे असे अंतरा देव यांनी म्हटले आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये ईस्ट बंगाल, मोहन बगान आणि मोहम्मदन या प्रसिद्ध फुटबॉल क्लबच्या प्रमुखांचा समावेश आहे. त्याशिवाय अभिजित विनायक बंडोपाध्याय यांना देखील सन्मानित केले जाणार आहे. एसएसकेएम रुग्णालयालादेखील पुरस्कार जाहीर झाला आहे. अमला शंकर, महाश्वेता देवी, संध्या मुखर्जी, सुप्रिया देवी आणि मन्ना डे अशा व्यक्तींना वंग विभूषणने गौरवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या