नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनला मोठा झटका दिला आहे. न्यायाधिकरणाने अॅमेझॉन-फ्युचर डीलबाबत आदेश जारी केला. एनसीएलएटीने या प्रकरणी अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीला ४५ दिवसांच्या आत २०० कोटी रुपयांचा दंड जमा करण्यास सांगितले आहे.
हे प्रकरण अमेझॉन आणि फ्यूचर रिटेल लिमिटेड कंपनीमधील १,४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या कराराशी संबंधित आहे. फ्यूचर ग्रुपच्या कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत फ्युचर रिटेलसाठी केलेल्या डीलच्या वादावर सीसीआयकडून मंजुरी मागे घेण्याची मागणी केली होती. अशा गुंतवणूक सौद्यांसाठी सीसीआयची मंजुरी आवश््यक आहे. सीसीआयने फर्व्हर ग्रुप कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर विचार केल्यानंतर अॅमेझॉनने काही माहिती दडपल्याचे आढळले.