22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयअमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना दिला विक्रमी व्हिसा

अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना दिला विक्रमी व्हिसा

एकमत ऑनलाईन

दिल्ली : भारतातील विद्यार्थ्यांना यंदा अमेरिकेकडून इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक व्हिसा मिळाले आहेत. दिल्लीतील यूएस दूतावासाने बुधवारी याबाबत माहिती दिली. दि युएस मिशन इन इंडिया या मोहिमेंतर्गत हे व्हिसा देण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाब भारतीय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.

यूएसमध्ये शिकणा-या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास २० टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०२१ मधील ओपन डोअर अहवालानुसार, २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात भारतातून जवळपास १.७ लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी गेले होते. त्यानंतर यंदा सन २०२२ मध्ये रेकॉर्डब्रेक ८२,००० विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत, जे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत. अमेरिका हा बहुतांश भारतीय कुटुंबांना उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक मागणी असलेला देश आहे अशी माहिती अमेरिकन दुतावासाने दिली आहे.

विद्यार्थ्यांनी अ‍ॅप डाऊनलोड करावे
दिल्लीतील अमेरिकन दूतावास आणि चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईतील चार वाणिज्य दूतावासांनी मे ते ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थी व्हिसा अर्जांच्या प्रक्रियेला प्राधान्य दिले. कारण यामुळे शक्य तितक्या पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या कालावधीत पोहोचता यावे, असेही दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे.

कॉन्सुलर अफेयर्सचे मंत्री समुपदेशक डॉन हेफ्लिन म्हणाले, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची गतिशीलता ही अमेरिकने डिप्लोमसीमध्ये केंद्रस्थानी आहे. दूतावासानं असं आवाहन केलंय की, अमेरिकेत शिकण्यासाठी सहाय्य शोधणा-या विद्यार्थ्यांनी ए४िूं३्रङ्मल्लवरअ कल्ल्िरंअस्रस्र डाउनलोड करावे. महाविद्यालयीन अर्ज प्रक्रियेबद्दल नवी माहिती मिळविण्यासाठी मोबाईलवर हे अ‍ॅप विनामूल्य उपलब्ध आहे.

भारताने टाकले चीनला मागे
२५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या नव्या यूके इमिग्रेशन आकडेवारीनुसार, जून २०२२ रोजी संपलेल्या वर्षात सुमारे १,१८,००० भारतीय विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसा मिळाला जो मागील वर्षाच्या तुलनेत ८९ टक्के जास्त.

यूकेमध्ये प्रायोजित अभ्यास व्हिसा मिळावणा-या देशात भारताने आता चीनला मागे टाकले आहे. त्याचबरोबर कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांकडून व्हिसा अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत. प्रचंड गर्दीमुळे अनेक देशांच्या मोहिमांमध्ये, विशेषत: कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या