18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयअमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार

अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कराराच्या आधारावर केली जाते. ते ३० सप्टेंबर रोजी सचिव (उच्च शिक्षण) म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात देशाचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले होते.

अमित खरे यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कौशल्य आणि विविध क्षेत्रातील विस्तृत अनुभवाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी उज्ज्वला योजनेतही योगदान दिले. डिसेंबर २०१९ मध्ये उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर थोड्याच दिवसात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला २९ जुलै २०२० रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

अमित खरे यांनी प्रसिद्ध चारा घाटोळा उघड केला होता. ज्यात राजद अध्यक्ष लालू यादव यांना तुरुंगात जावे लागले होते. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी चारा घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आले. दरम्यान, केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. गेल्या तीन वर्षांपासून ते सल्लागार होते. त्यातच आता पंतप्रधानांच्या नव्या सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या