23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय दिल्लीत वाढत्या कोरोनासंसर्गाबाबत अमित शाह दक्ष

दिल्लीत वाढत्या कोरोनासंसर्गाबाबत अमित शाह दक्ष

तातडीची बैठक ; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमधील कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक पातळीवर गेला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावरील उपाययोजनांसाठी तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजलदेखील उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमधील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १२ दिवसांपासून वेगाने वाढत चालली आहे.

नवी दिल्लीत अद्यापही कोरोना स्थिती नियंत्रणात आलेली नाही. दिल्लीमधील कोरोना नियंत्रणासाठी अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बैठका घेतल्या आहेत.

अमेरिकेत २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या