18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयकाश्मिरात हिंसा घडताना अमित शहा गरबा खेळत होते

काश्मिरात हिंसा घडताना अमित शहा गरबा खेळत होते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : लखीमपूर खिरीला जाणारे राहुल आणि प्रियांका काश्मीरला का गेले नाहीत? या भाजपच्या आक्षेपाला काँग्रेसच्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिले. काश्मीरमध्ये हिंसा घडत असताना गृहमंत्री अमित शहा मात्र गरबा खेळण्यात व्यस्त होते, असा आरोपी देखील त्यांनी केला आहे.

हिंसाग्रस्त कुटुंबियांना आपले भेटणे हे राहुल गांधी यांच्या आदेशानुसारच होते. पक्षाच्या कार्यक्रमासाठी भुवनेश्वरमध्ये असताना राहुल यांनी आपल्याला फोन करून काश्मीरला जाण्यास सांगितले होते. जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या प्रतिनिधी या नात्याने मी पीडित कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेले. मात्र, अमित शहा कुठे होते? जम्मू काश्मीरमध्ये हिंसा होत असताना अमित शाह हे मात्र नवरात्रीचा गरबा खेळत होते. मग त्यांना हा प्रश्न का विचारला जात नाही? असा सवालही रजनी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार
काश्मीर खोरे पुन्हा अशांत होऊ लागले असून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचे केलेले हत्याकांड मन विषण्ण करणारे आहे. ३७० कलम हटविल्यानंतर सारे काही सुरळीत असल्याचा दावा करणारे केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनच या हिंसेला जबाबदार आहे, असा आरोप रजनी पाटील यांनी केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या