23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयअमित शहांची मफलर ८० हजारांची : गेहलोत

अमित शहांची मफलर ८० हजारांची : गेहलोत

एकमत ऑनलाईन

जयपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान महागडा टी शर्ट परिधान केल्याची टीका भाजपने केली होती. भाजपच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मफलर सुमारे ८० हजार रुपयांची व भाजप नेत्यांचे गॉगल तब्बल अडीच लाख रुपयांचा असल्याचा पलटवार केला.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकचिंताग्रस्त झाले असल्याचा दावाही गेहलोत यांनी यावेळी केला. ते चुरूमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते यावेळी म्हणाले, की ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल भाजप नेत्यांना काय समस्या आहे? ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टी शर्टविषयी बोलत आहेत, मात्र भाजप नेते स्वत:च अडीच लाख रुपयांचे गॉगल वापरतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मफलरची किंमत सुमारे ८० हजार रुपये इतकी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या