31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयअमित शहांचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला

अमित शहांचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कृषि कायद्यांविरोधात आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आंदोलकांशी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. तो शेतक-यांनी धुडकाऊन लावला आहे. बुराडी येथील निरंकारी मैदानात आंदोलन करणार नाही तर सिंधू बॉर्डरवरच ठिय्या आंदोलन करतील. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून लेखी स्वरुपात चर्चेचे निमंत्रण मिळाले तरच चर्चा होईल असा पवित्राही शेतक-यांनी घेतला आहे.

एकीकडे शेतक-यांनी बुराडी येथे आंदोलन करण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे निरंकारी समागम मैदानात या आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरु आहे. शेतकरी आंदोलन आणि गृहमंत्री अमित शाह यांची अट या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रसरकारला शहाणपणाचे बोल शिकविले आहेत. शेतक-यांशी चर्चेसाठी कोणत्याही प्रकारची अट न ठेवता लवकरात लवकर चर्चा व्हायला हवी. ते आपल्या देशाचे शेतकरी आहेत. त्यांना जिथे पाहिजे तिथे आंदोलनाची परवानगी मिळायला हवी असे जैन यांनी सांगितले आहे.

जेव्हा तिकीट हवे असते, तेव्हाच जात आठवते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या