26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयअमित शहांची सुरक्षा पुन्हा भेदली

अमित शहांची सुरक्षा पुन्हा भेदली

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा एकदा निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे. तेलंगाणा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते हैदराबादच्या दौ-यावर आहेत. या ठिकाणी शाह यांच्या ताफ्याच्या समोरच तेलंगाणा राष्ट्र समितीच्या(टीआरएस) एका नेत्याने आपली कार पार्क केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ माजली.

मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी अमित शाह शुक्रवारी रात्री उशीरा हैदराबादेत पोहोचले. याचवेळी शाह यांच्या ताफ्याच्या पुढे टीआरएस नेता गोसुला श्रीनिवास यांनी अचानक आपली कार उभी केली. या प्रकारामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ माजली. पण त्यांनी तात्काळ सतर्क होत त्यांची कार तिथून हटवली. दरम्यान, आपल्या कारची तोडफोड केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. मी कार चालवताना तणावाच्या स्थितीत होतो त्यामुळे अचानक माझी कार त्या ठिकाणी थांबली. पण कार हटवण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी माझ्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे असे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या