नवी दिल्ली : पंजाब लोक काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांचा पक्ष ते भाजपमध्ये विलीन करणार असल्याचीही चर्चा आहे. सन २०२२च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागल्याने अमरिंदर सिंग यांनी ‘पंजाब लोक काँग्रेस’ हा नवा पक्ष स्थापन करत विधानसभा निवडणूक लढवली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग ८० वर्षांचे आहेत. या वयाच्या लोकांना भाजपकडून निवडणुकांमध्ये तिकीट दिले जात नाही. त्यामुळेच त्यांनी नवा पक्ष स्थापन केला होता.