27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयहाथरस प्रकरणात एक आरोपी अल्पवयीन

हाथरस प्रकरणात एक आरोपी अल्पवयीन

एकमत ऑनलाईन

हाथरस : हाथरससामूहिक बलात्कार प्रकरणी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या टीमने आरोपींची जवळपास ८ तास चौकशी केली. एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने चार आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती दिली आहे. कुटुंबीयांकडून संबंधित आरोपीच्या कुटुंबीयांकडून सीबीआयला आरोपीची एक मार्कशीट देण्यात आली आहे. मार्कशीटमध्ये आरोपीची जन्मतारीख २ डिसेंबर २००२ असल्याचे नमूद केले आहे.

सीबीआयच्या एका टीमने चंदपा पोलीस स्टेशनलाही भेट दिली. याच पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा प्रकरणाची एफआयआर दाखल केली होती. तसेच टीमने या पोलीस स्टेशनचे तीन निलंबित पोलीस कर्मचा-यांची चौकशी केली. तसेच दोन स्थानिक पत्रकारांचीकडेही प्रकरणाची चौकशी केली. १४ सप्टेंबर रोजी पीडितेची आई आणि भाऊ तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले असताना हे दोन पत्रकारही त्यांच्यासोबत होते. पीडितेला पोलीस स्टेशनमधून जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणा-या ऑटो ड्रायव्हरकडेही सीबीआयने चौकशी केली. यापूर्वी टीमने अलीगडच्या जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेजचा दौरा केला. पीडितेला दिल्लीला हलवण्यापूर्वी तिच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू होते.

केंद्राकडे बोट दाखविण्याऐवजी शेतक-यांना मदतीची हिंमत दाखवावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या