21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयबॉम्बच्या अफवेने इंडिगो विमानाचे उड्डाण सहा तास रखडले

बॉम्बच्या अफवेने इंडिगो विमानाचे उड्डाण सहा तास रखडले

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : कर्नाटकातील मंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण आणि त्याची गर्लफ्रेण्ड यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे मुंबईला येणाऱ्या विमानाला तब्बल सहा तास उशीर झाला. एवढंच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. त्यानंतर विमानात काही स्फोटकं आहेत का, याची तपासणी करण्यात आली.

जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे?
हा प्रकार रविवारचा म्हणजेच १४ ऑगस्टचा आहे. झालं असं की, इंडिगो एअरलाईन्सचं विमान मंगळुरुहून मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार होतं. सर्व प्रवासी विमानात बसले असताना संबंधित तरुणाच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने व्हॉट्सअ‍ॅप चॅट पाहिलं. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत चॅट करत होता. त्या दोघांमधील चॅट संशयास्पद वाटल्याने महिला प्रवाशाने याची माहिती क्रू मेंबर्सना दिली. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला सतर्क केलं आणि उड्डाणासाठी तयार असलेलं विमान पुन्हा माघारी पाठवलं.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या