30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयआनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मने

आनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मने

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे खूप चर्चा सुरू आहे. गरीबीचा सामना करणारे माजी नॅशनल बॉक्सर आबिद खान यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आबिद एनआयएसमधून क्वालिफाइड कोचदेखील आहेत. मात्र त्यांना कुठेही नोकरी न मिळाल्याने ते रिक्षा चालवून आपले कुटुंब चालवित आहेत.

सौरभ दुग्गल यांनी आबिद यांच्यावर आलेल्या संकटाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. आनंद महिंद्रांनी हे रिट्विट करीत लिहिलं आहे की, धन्यवाद सौरभ. मला या गोष्टीचे खूप कौतुक आहे की, कठीण परिस्थिती असतानाही ते कोणत्याही मदतीची अपेक्षा करीत नाहीत. त्यामुळे मी लोकांना मदतीचे आवाहन करण्यापेक्षा त्यांची प्रतिभा आणि व्यासंग खूप मोलाचा आहे. मी त्यांचे स्टार्टअप बॉक्सिंग अकॅडमीमध्ये गुंतवणूक करू शकतो का आणि या माध्यमातून त्यांना मदत करू शकतो का, याबाबत मला सांगा.

काय करतात आबिद खान
व्हिडिओमध्ये आबिद खान म्हणतात की, गरीब किंवा मिडल क्लास व्यक्तीसाठी गरीबी हा सर्वात मोठा शाप आहे. आणि त्यापेक्षाही तो क्रीडा प्रेमी असेल तर परिस्थिती अधिक बिकट होते. यामध्ये वेळेच्या अपव्ययाशिवाय दुसरे काही नाही. स्पोर्ट्समॅन असताना मी खूप यश मिळवले. डिप्लोमा केला मात्र त्यानंतर मला नोकरी मिळाली नाही. सर्वत्र नकारचं मिळत होता. बॉक्सिंगमध्ये मिडल क्लास किंवा गरीब लोक येतात. कारण यात खूप धक्के खावे लागतात. पैसे वाले तर क्रिकेट, लॉन टेनिस, बँडमिंटप खेळतात.

आनंद महिंद्रा नेहमीच अशा प्रकारचे व्हिडिओ, फोटो शेअर करून समाजातील दुर्लक्षित घटकांकडे लक्ष वेधतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी केलेले ट्विट वाचण्यासाठी युजर्स कायम उत्सुक असतात.

१५ दिवसांत जाधव कुटुंबियांना कोरोनाने संपवले; पुणेकरांनो, सावध व्हा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या