22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआनंद शर्मा यांनीही दिला राजीनामा

आनंद शर्मा यांनीही दिला राजीनामा

एकमत ऑनलाईन

कॉंग्रेसच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद सोडले
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. स्वाभिमानाशी तडजोड होऊ शकत नाही, अशा आशयाचे पत्र आनंद शर्मा यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शर्मा यांनी ट्विटरवरदेखील लिहिले की, मी जड अंत:करणाने हिमाचल निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी आजीवन काँग्रेसचा सदस्य आहे. तसेच मी माझ्या विचारांवर ठाम आहे. माझ्या रक्तात वाहणा-या काँग्रेसच्या विचारसरणीशी माझी बांधिलकी आहे. याबद्दल कोणतीही शंका नाही. तथापि, एक स्वाभिमानी व्यक्ती म्हणून सतत होणारे दुर्लक्ष आणि अपमान पाहता माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, असेही शर्मा पुढे म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या अशाच हालचालीनंतर अवघ्या पाच दिवसांनी काँग्रेसमध्ये आणखी एक राजीनामा आला आहे. नियुक्तीनंतर काही तासांतच आझाद यांनी १६ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, सल्लागार प्रक्रियेत आपल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, राज्यातील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या