22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयआंदोलकांकरिता मुस्लिम तरुणांनी सुरू केली लंगर सेवा

आंदोलकांकरिता मुस्लिम तरुणांनी सुरू केली लंगर सेवा

शेतक-यांसाठी २४ तास जेवनाची व्यवस्था;  शेतक-यांचे ऋण फेडण्याची हिच वेळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीच्याच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. एकीकडे शेतक-यांचा हा लढा सुरु असतानाच दुसरीकडे शेतक-यांना मदत करणारे हातही पुढे येत आहे. दिल्लीतील २५ मुस्लीम व्यक्तींनी एक गट निर्माण केला असून ते आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतक-यांसाठी लंगर म्हणजेच जेवणाची सोय करु देत आहे.

मुस्लीम फेड्रेशन ऑफ पंजाब या संस्थेचे हे सदस्य आहेत. फारुकी मुकबीन हा तरुण या २५ जणांच्या टीमचे नेतृत्व करत आहे़ सर्वांचे पोट भरणा-या शेतक-याचे पोट भरण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे फारुकी सांगतो. आंदोलन सुरु असेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस २४ तास लंगरची सोय उपलब्ध असणार आहे, असे फारुकीने बोलताना सांगितले. शेतकरी आपल्यासाठी एवढें काय काय करतात. आज आपण त्याची परतफेड करण्याची वेळ आहे, अशा भावनाही फारुकीने व्यक्त केली.

शेतक-यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आमचा २५ स्वयंसेवकांचा गट आहे. लंगर दिवस-रात्र सुरु रहावा म्हणून आम्ही काम करत आहोत, असेही फारुकी म्हणाला. प्रामुख्याने हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधून दिल्लीत येणा-या मार्गांवर राजधानीच्या सीमांवरच शेतक-यांनी हे आंदोलन सुरु केला आहे. या आंदोलनचा सोमवार दि़ ७ डिसेंबर रोजी १२ वा दिवस आहे.

पोट भरणा-यांचे पोट भरण्यासाठी आलोत : फारुकी
सर्वांचे पोट भरणा-या शेतक-याचे पोट भरण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे फारुकी सांगतो. आंदोलन सुरु असेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस २४ तास लंगरची सोय उपलब्ध असणार आहे, असे मुस्लीम फेड्रेशन ऑफ पंजाब या संस्थेचे सदस्य फारुकी मुकबीनने सांगितले.

अहोरात्र काम करतायेत २५ मुस्लिम बांधव
लंगरमध्ये जेवनाची २४ तास सेवा असल्याने मुस्लीम फेड्रेशन ऑफ पंजाब या संस्थेतील २५ सदस्य शेतक-यांसाठी अहोरात्र झटत आहेत़ एकही आंदोलन उपाशी राहता कामा नये, असा निश्चय असल्याचे सदस्यांनी म्हटले आहे़

तबला मारून एकाची हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या