25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीय..आणि ६० रुग्णांचे प्राण वाचले

..आणि ६० रुग्णांचे प्राण वाचले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीत सध्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशातच सर गंगाराम रुग्णालयात केवळ दोन तासांपुरताच ऑक्सिजन उरला असून गेल्या २४ तासांत २५ रुग्णांनी आपले प्राण गमावल्याचा तातडीचा संदेश रुग्णालयाकडून प्रशासनाला धाडला होता. त्यानंतर प्रशासनाने जलद गतीने रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा केल्याने गंभीर अवस्थेतील ६० रुग्णांचा जीव वाचला आहे.

दिल्लीतील अनेक रुग्णालयांकडून सरकारकडे जलद ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी होत आहे. सर गंगाराम रुग्णालयात तर गंभीर परिस्थिती असून गेल्या २४ तासांत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांनी प्राण सोडला आहे. गंभीर अवस्थेतील ६० रुग्णांचाही जीव धोक्यात होता. रुग्णालयात अवघ्या दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा आहे, व्हेन्टिलेटर आणि बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर योग्य पद्धतीने काम करत नाही,रुग्णालयात आयसीयू आणि ईडीमध्ये मॅन्युअल पद्धतीने व्हेन्टिलेशन सुरू असल्याचा संदेश सर गंगाराम रुग्णालयाकडून देण्यात आला होता. त्यानंतर सकाळी १०.०० वाजल्याच्या सुमारास गंगाराम रुग्णालयाला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे ६० रुग्णांचा जीव वाचला.

मॅक्स रुग्णालयातही तातडीने पुरवठा
मॅक्स रुग्णालयानेही शुक्रवारी सकाळी ट्विट करून ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत सांगितले होते. त्यानंतर सकाळी १०.००च्या दरम्यान मॅक्स रुग्णालयालाही ३ तास पुरेल एवढा तातडीचा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. तसेच आणखी एक वाहनही काही तासांनी पोचल्याने रुग्णालयातील ५५० कोव्हिड रुग्णांना दिलासा मिळाला.

वसईच्या विरार कोविड रुग्णालयात भीषण आग; १३ रुणांचा होरपळून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या