24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयअनिल अंबानींनी दडवले हजारो कोटी!

अनिल अंबानींनी दडवले हजारो कोटी!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय आणि चीनी बँकांची कर्जे फेडण्यास असमर्थ असल्याचे भासवत दिवाळखोर बनलेल्या उद्योजक अनिल अंबानी यांचा खरा चेहरा पँडोरा पेपर्स लीकमधून उघड झाला आहे. यूकेमध्ये (ब्रिटन) दिवाळखोर बनलेल्या अनिल अंबानी यांच्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रस या देशांमध्ये १८ कंपन्या असून यात त्यांनी हजारो कोटी दडवले असल्याचे पँडोरा पेपर्स लीकमधून समोर आले आहे.

अनिल अंबानी यांच्यावर चिनी बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. न्यायालयीन लढाईसाठी वकिलाला देण्यासाठी पैसे नाहीत, असे अनिल अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वी यूकेमधील न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार कोर्टाने अनिल अंबानी यांना दिवाळखोर जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात पँडोरा पेपर्स लीकमधून अनिल अंबानी यांनी कर चुकिवगिरीसाठी नंदनवन असलेल्या देशांमध्ये बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी दडवले असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल अंबानी यांच्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रस या देशांमध्ये १८ कंपन्या आहेत. या कंपन्या त्यांनी २००७ ते २०१० मध्ये सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ७ कंपन्यांनी कर्ज घेऊन जवळपास १.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल अंबानी यांच्याशिवाय फरार हिरे व्यापारी आणि युकेमध्ये तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या बहिणीनेदेखील अशीच बनावट ट्रस्ट स्थापन करून पैसे हस्तांतर केले आहेत. नीरव मोदी भारतातून पळून जाण्याच्या एक महिना आधी ही ट्रस्ट करण्यात आली असल्याचा दावा पँडोरा पेपर्सने केला आहे.

अदानींनी बंद केली कंपनी
उद्योजक गौतम अदानी यांच्या भावाने विनोद अदानी यांनी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये तीन वर्षांपूर्वी कंपनी सुरु केली आहे. मात्र पँडोरा पेपर्स लिकमध्ये नाव आल्यानंतर ही कंपनी बंद केली असल्याचे विनोद अदानी यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या